विधान परिषद निवडणूक घोषित; 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान

Vidhan Parishad Election 2024 – राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, येत्या शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर मंगळवार, दि. 2 जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 11 सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम…

  • 25 जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
  • 2 जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल.
  • 3 जुलै अर्ज छाननी
  • 5 जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत
  • 12 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल.
  • 12 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

या आमदारांचा कार्यकाळ संपला

  • मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट)
  • भाई गिरकर (भाजप)
  • नीलय नाईक राष्ट्रवादी
  • (अजित पवार गट)
  • बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
  • अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट)
  • रमेश पाटील (भाजप)
  • वजहत मिर्झा (काँग्रेस)
  • रामराव पाटील (भाजप)
  • प्रज्ञा सावंत (काँग्रेस)
  • महादेव जानकर (रासप)
  • जयंत पाटील (शेकाप) या आमदारांच्या जागा आता रिक्त होणार आहेत.

हेही वाचा: