विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये

HOTEL DEMOCRACY SATPUR www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री गुरुवारी (दि.10) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांचे सुपुत्र केतन व चंद्रकांत सानप यांची सुकन्या शिवानी यांच्या विवाहसोहळ्यास मंत्री हजेरी लावणार आहेत. गुरुवारी (दि.10) सायंकाळी 7 वाजता सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे हा विवाहसोहळा होणार आहे. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व क्रीडामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आ. आशिष शेलार आदी मान्यवरही विवाहास उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post विवाहसोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.