विवाहांसाठी आता पोलिसांची परवानगी होणार सक्तीची : पोलिस आयुक्त दीपक पांडे

म्हसरूळ (नाशिक) : जेथे नागरिकांचा जमाव जमणार आहे, अशा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह विवाहांसाठी आता पोलिसांची परवानगी घेणे सक्तीचे होणार आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शनिनारी (ता. ५) ही माहिती दिली. 

आयुक्तांनी दर शनिवारी पोलिस ठाण्याच्या भेटी व स्थानिकांच्या अडचणी जाणून घेण्याचा उपक्रम सुरू केला असून, त्याअंतर्गत शनिवारी आडगाव पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्तांचा जनता दरबार, शांतता समिती सदस्य, पोलिसमित्र व पोलिसपाटलांच्या बैठकीत श्री. पांडे बोलत होते. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सीताराम गायकवाड, नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, अजिंक्य वाघ, शशिकांत राऊत, पोलिसपाटील गजाजन भोर आदींसह आडगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 

नागरिकांच्या तक्रारी 

नगरसेवक उद्धव निमसे यांनी, लोक रस्त्यात बेशिस्तपणे गाड्या लावतात, त्यामुळे अडथळा होतो. अतिक्रमण काढण्यास पोलिसांना सहकार्य करावे. नगरसेवक सुरेश खेताडे यांनी, मिर्ची हॉटेल चौक सिग्नल, शिवनगर चौकात अपघातावर उपाययोजना करण्याची मागणी केली. शशिकांत राऊत यांनी, पोलिसिंग-नाकाबंदीदरम्यान नागरिकांना त्रास कमी झाल्याचे सांगितले. औरंगाबाद मार्गावरील माडसांगवी, ओढा, शिलापूर, लाखलगाव, विडी कामगारनगर, तपोवन भागात गतिरोधक बसविण्याची मागणी उपस्थितांनी केली. विशाल जेजुरकर यांनी निलगिरी बाग परिसरातील रस्त्यावरील भाजी बाजाराचा प्रश्‍न मांडला. 

कोरोनायोद्ध्यांचा सत्कार 

नागरिकांनी रस्त्यावरील बेशिस्त वाहनांच्या पार्किंगपासून तर गुन्हेगारीपर्यंतच्या अडचणी मांडल्या. तसेच या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन यांचा सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

ठाणे अंमलदार खरा आयुक्त 

पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार अधिक काळ सेवा देणारा कर्मचारी असतो. ठाणे अंमलदार नाशिक शहरातील असल्याने पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम ठाणे अंमलदार करीत असतो. त्यामुळे ठाणे अंमलदार हाच खऱ्या अर्थाने पोलिस आयुक्त असल्याचे सांगत आयुक्तांनी ठाणे अंमलदारांच्या कामगिरीचे कौतुक केले. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच