विवाहित तरुणाने संपविली जीवनयात्रा; अचानक घडलेल्या घटनेने संशयाची सुई कायम

सोग्रस (जि.नाशिक) : चांदवड येथील एका विवाहित तरूणाने अचानक आपली जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना घडताच नातेवाईंकामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दुर्दैवी घटनेने नातेवाईंकामध्ये संशयाचे वातावरण
शिरसाने तालुका चांदवड येथील गोरख घोलप वय 32 या तरुणाने काल संध्याकाळच्या सुमारास काहीतरी विषारी औषध सेवन केले. ही घटना त्याचे कुटुंबियातील सदस्यांना समजताच त्यांनी त्यास त्वरित उपचारांसाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिरसाने तालुका चांदवड येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. गोरख घोलप हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

शिरसाने तालुका चांदवड येथील एका विवाहित तरूणाने काल संध्याकाळच्या वेळेस काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेसंदर्भात वडनेर भैरव तालुका चांदवड पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर