विवाह नोंदणी करताय? आतापासून ‘ही’ कागदपत्रे असतील महत्वाची; महापालिकेचा आगळावेगळा उपक्रम

नाशिक : विवाह नोंदणी करताना आधारकार्ड, नव जोडप्यांचे छायाचित्र, साक्षीदारांची सही यांसह विविध कागदपत्रांची आवश्‍यकता असते. याचबरोबर आता आणखी दोन महत्वाची कागदपत्रे भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. महापालिका महसुलात भर पाडण्याचा आगळावेगळा उपक्रम कार्यालय परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

महापालिका महसुलात भर पाडण्याचा आगळावेगळा उपक्रम
विवाह नोंदणी करताना आधारकार्ड, नव जोडप्यांचे छायाचित्र, साक्षीदारांची सही यांसह विविध कागदपत्रांची आवश्‍यकता असते. याचबरोबर आता घरपट्टी आणि पाणीपट्टी भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. १ फेब्रुवारीपासून पूर्व विभागात उपक्रमांस सुरवात केली आहे. नागरिकांचा यास प्रतिसाद भेटल्यास महापालिका महसुलात वाढ होणार आहे. प्रयोगिक तत्त्वावर विभागीय अधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांनी कार्यालयातील विवाह नोंदणी विभागाच्या कर्मचाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. त्यामुळे आता पूर्व विभागात विवाह नोंदणीस जाणाऱ्या प्रत्येकास घरपट्टी, पाणीपट्टी भरणा करावी लागणार आहे. महापालिकेच्या सहा विभागांत अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा पूर्व विभाग पहिला विभाग आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळाल्यास हा उपक्रम पुढे सुरुच ठेवण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

विवाह नोंदणीस घरपट्टी, पाणीपट्टी, भरल्याची पावतीची आवश्‍यक 

महापालिका महसुलात भर पाडण्याच्या निमित्ताने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांवर कुठल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. त्यामुळे केवळ तोंडी सूचना देण्यात आल्या आहे. - स्वप्नील मुधलवाडकर, विभागीय अधिकारी  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच