विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर; गावक-यांनी केले जलपूजन

म्हाळुंगी नदी

सिन्नर(नाशिक), पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीचा उगम असलेल्या विश्रामगड परिसरात ठाणगाव येथे आज (दि.१०) आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत गावातून जाणाऱ्या म्हाळुंगी नदीचे विधिवत जलपूजनही केले. पहिल्यांदाच म्हाळुंगीवरील बंधारा दुथडी भरुन वाहू लागल्याने गावक-यांनी नारळ वाढवत विधिवत जलपूजन करुन दर्शन घेतले.

तसेच, या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्‍यामूळे ठाणगाव येथील बंधाऱ्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने परिसरातील शेतकरी सुखावले असून शेतीकामांनाही वेग आला आहे.

म्हाळुंगीच्या पाण्यामुळे परिसरातील ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे या गावांना फायदा होणार आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाण्यासाठयातही झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. पावसामूळे अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे, असे गावक-यांनी सांगितले.

हेही वाचा  

The post विश्रामगड परिसरात म्हाळुंगी नदीचे पाणी पात्राबाहेर; गावक-यांनी केले जलपूजन appeared first on पुढारी.