विहिरीवरच घेरले काळाने; विवाहितेच्या बातमीने परिसरात शोककळा

देवळा (जि.नाशिक) : सायंकाळी साडेपाचची वेळ.. विवाहिता रोहिणी  पाणी काढण्यासाठी विहिरीवर गेली..पण त्यावेळी अचानक काळाने घेरले आणि होत्याचे नव्हते होऊन बसले..काय घडले वाचा..

विहिरीवर पाणी भरायला गेलेल्या विवाहितेचा थेट मृतदेहच हाती 

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रोहिणी बळिराम जाधव (वय ३२) विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीला पाणी जास्त असल्याने मृतदेह शोधण्यासाठी विहिरीतील संपूर्ण पाण्याचा उपसा करण्यात येऊन गुरुवारी दुपारी एकला मृतदेह बाहेर काढण्यात आला.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

भिलवाड (ता. देवळा) येथील महिलेचा पाय घसरून ती विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता.२) घडली. गुरुवारी (ता.३) महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. रोहिणी जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच