वीस किमीच्या परिघातही ‘छप्पर फाडके’ टोलवसुली! वाहन चालकात भयंकर संताप  

नाशिक रोड : नाशिक- सिन्नर रस्त्यावरील शिंदे येथील टोल नाक्यावर सध्या नियम डावलून ‘छप्पर फाडके’ टोलवसुली सुरू आहे. स्थानिक वाहनधारकांना लांब पल्ल्याचा टोल आकारला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे. 

महिलांचा वाहनचालकांवर रुबाब 
शिंदे टोल नाक्यावर काही स्थानिक वाहनांना सूट आहे. वीस किलोमीटरच्या अंतरावरील वाहनधारकांना लोकल टोल वेगळा आहे. लांब पल्ल्याच्या वाहनांना टोल वेगळा आहे. मात्र, लोकल टोल सांगितला तरी लांब पल्ल्याच्या वाहनांचा टोल सध्या काही वाहनांकडून वसूल केला जात आहे. येथील महिला वाहनचालकांवर रुबाब करतात, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. यामुळे या टोलवर लोकल वाहनांना आहे. त्या नियमानुसार टोल वसूल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.  

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा