वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीत! नाशिकच्या संस्कृती रुग्णालयाला महापालिकेकडून दंड 

नाशिक : कुठल्याही रुग्णालयात विविध आजाराने ग्रस्त रुग्ण उपचार घेत असतात. त्यांच्या उपचारादरम्यान निघालेला बायोमेडिकल वेस्ट कचरा उचलण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेकडून विशेष व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्वतंत्र घंटागाडीदेखील महापालिकेने उपलब्ध करून दिली. त्या कचऱ्यातून अन्य कुणास संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. असे असताना काही जण असा कचरा नियमित घंटागाडीतच टाकतात. असाच प्रकार भाभानगरमध्ये उघडकीस आला.

दंड करण्याचा पहिलाच प्रकार

बायोमेडिकल वेस्ट कचरा घंडागाडीत टाकल्याने महापालिका पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून संस्कृती मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयास २५ हजारांचा दंड केला. सहा विभागांत अशा प्रकारचा दंड करण्याचा पहिलाच प्रकार असल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांनी दिली. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

येथील संस्कृती मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयातून बायोमेडिकल वेस्ट कचरा नियमित घंटागाडीत टाकण्यात आला. त्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न यातून झाला. पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांनी घंटागाडीतील कचऱ्याची तपासणी केली. त्यात बायोमेडिकल कचरा आढळला. शिरसाट यानी त्यांच्या कर्मचाऱ्यासह रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनासमोर घडलेला प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर रुग्णालयालयावर कारवाई करत २५ हजारांचा दंड केला. महापालिकेच्या सहाही विभागांपैकी पूर्व विभागाकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.  

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली