‘वॉटरग्रेस’ रद्दचा प्रस्ताव महासभेत नाहीच! अतिक कमाल यांचा नोटांची माळ घालून निषेध 

मालेगाव (नाशिक) : शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे न ठेवल्याने माजी विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांनी गळ्यात नोटांची माळ घालून ऑनलाइन महासभेत सहभाग घेत निषेध व्यक्त केला. यासह डोक्याला काळी पट्टी बांधली होती. ‘वॉटर ग्रेस कंपनी दुध देणेवाली भैस’ असे पट्टीवर लिहित आपला रोष व्यक्त केला. 

काय आहे नेमके प्रकारण?

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव महापालिकेची महासभा झाली. या वेळी ऑनलाइन महासभेत जुना आग्रा रस्त्यासह शहरातील इतर मोठे व नवीन रस्त्यांचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अली अकबर हॉस्पिटलजवळ अठरा मीटरच्या रस्त्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेच्या भूसंपादनास मंजुरी देण्यात आली. येथील सायजिंगचा विषय प्रलंबित आहे. त्यांना मंजुरी देण्यासाठी शासनास विकास नियम प्रणालीप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या वेळी शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे न ठेवल्याने याचा निषेध करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांनी दोन हजारांच्या नोटांची माळ गळ्यात घालून तसेच काळी फीत बांधून महासभेत सहभाग घेतला. 

आणि म्हणून निषेध..

स्थायी समितीने १ जुलैच्या सभेत वॉटर ग्रेस कंपनीला आणखी दहा वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. हा ठराव रद्द करण्याचे आश्‍वासन महापौर, आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांनी दिले होते. या संदर्भातील प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यासाठी स्मरणपत्र देण्यात आले होते. असे असताना महासभेपुढे हा प्रस्ताव ठेवला नाही. याचा निषेध म्हणून त्यांनी काळी फीत लावून नोटांची माळ गळ्यात घातल्याचे सांगितले. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

‘वॉटर ग्रेस दुध देणारी म्हैस'

‘वॉटर ग्रेस दुध देणारी म्हैस’ असून, पदाधिकारी व अधिकारी संबंधित ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात आर्थिक उलाढाली होत असल्याचा आरोप अतिक कमाल यांनी केला आहे. ऑनलाइन महासभेत ६५ ते ७० नगरसेवकांसह नगरसचिव पंकज सोनवणे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, कैलास बच्छाव, कमरुद्दिन शेख, संजय जाधव आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.  

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ