‘व्हॅलेंटाइन वीक’चा नाद भोवला! ‘प्रपोज डे’च्या दिवशी प्रियकराची आत्महत्या

नाशिक :  एकीकडे ‘व्हॅलेंटाइन वीक’ चा उत्साह प्रेमीयुगलांमध्ये शिगेला पोहचला असतानाच दुसरीकडे मात्र दुर्देवी घटना घडली आहे. ‘प्रपोज डे’लाच प्रियकराने जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले नेमके?

 ‘प्रपोज डे’लाच प्रियकराने जीवन संपविण्याचा निर्णय

एका सोसायटीमध्ये भाड्याने राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) याने मैत्रिणीला प्रेम असल्याचे सांगत लग्नाची मागणी घातली; मात्र तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून अजय याने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपविले. सोमवारी घटना उघडकीस आली. अजयचा रूम पार्टनर किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना अजय याने तो येण्यापूर्वीच गळफास घेतला. जेव्हा किरण हा दुपारी घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावले असता अजयने गळफास घेतल्याचे लक्षात आले.",

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

परिसरात हळहळ व्यक्त

‘प्रपोज डे’लाच एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर भागात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट