शंभर टक्के वीजबिल भरणारे उत्तर महाराष्ट्रातील ‘हे’ पहिले गाव! महावितरणकडून चक्क स्पर्धा

नैताळे (जि.नाशिक) : महाराष्ट्रात सर्वत्र वीजबिल भरणासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.या गावातून अतिशय कमी कालखंडात शंभर टक्के बिल भरणा झाला. यातून महावितरण कंपनीला २२ लाखांचा महसूल मिळाला. वीजबिल भरण्यासाठी चक्क स्पर्धा करून शंभर टक्के वीजबिल भरणा केला. त्यामुळे या गावाचा उत्तर महाराष्ट्रात अव्वल क्रमांक आला आहे,

शंभर टक्के वीजबिल भरणारे हे उत्तर महाराष्ट्रात पहिले गाव 

निफाड तालुक्यातील पूर्व भागातील बोकडदरे येथे वीज वितरण कंपनीने ग्रामसभा घेऊन कृषी वीज धोरण-२०२० ही योजना व गावाचा फायदा या बाबी समजावून सांगितल्या. बोकडदरे येथे वीजबिल भरण्यासाठी चक्क स्पर्धा होऊन १८० ग्राहकांनी २२ लाख रुपये भरणा करून शंभर टक्के वीजबिल भरणा केला. त्यामुळे या गावाचा उत्तर महाराष्ट्रात अव्वल क्रमांक आला आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी दिली. नैताळे येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

चक्क स्पर्धा करून शंभर टक्के वीजबिल भरणा
महाराष्ट्रात सर्वत्र वीजबिल भरणासाठी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून निफाड उपविभागातील बोकडदरे येथे कंपनीचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे व सहाय्यक अभियंता पूजा वाळुंज यांनी बोकडदरे ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहून कृषी वीज धोरण-२०२० ही योजना सांगितली. बोकडदरे ग्रामस्थांनी योजना समजून घेतल्याने वीजबिल भरणा करण्यासाठी चक्क स्पर्धा झाली.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

बोकडदरे येथील शेतकऱ्यांचा सन्मान

अतिशय कमी कालखंडात शंभर टक्के बिल भरणा झाला. यातून कंपनीला २२ लाखांचा महसूल मिळाला. कंपनीचे अधीक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी परिसराला भेट दिली. नैताळे येथे कोविडचे नियम पाळून एक कार्यक्रम घेऊन बोकडदरे येथील शेतकऱ्यांचा सन्मान केला. शंभर टक्के वीजबिल भरणा करून गावाने महाराष्ट्रात नावलौकिक वाढविला आहे. नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, सहाय्यक अभियंता कैलास शिवदे, निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, सहाय्यक अभियंता पूजा वाळुंज, जनमित्र अतुल गजबे यांचाही सन्मान करण्यात आला. भाऊराव दराडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी वीज वितरण कंपनीचे सेवक उपस्थित होते. 

 

बोकडदरेने कृषिपंपाचे शंभर टक्के वीजबिल भरून परिसरात आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही कृषी धोरण-२०२० या योजनेत भाग घेऊन आपला व परिसराचा लौकिक वाढवावा. 
-बंकट सुरवसे, उपकार्यकारी अभियंता