शरद कोळी इतके मोठे नाही की, मी त्यांच्या आरोपांवर उत्तर द्यावे : गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

जळगांव : शरद कोळी इतके मोठे नाही की त्यांच्या आरोपावर मी उत्तर द्यावे. ते ज्या ग्राउंड वर मॅच खेळत आहे त्या ग्राऊंडवर मी 35 वर्षापासून खेळत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हेच शिकवले आहे, वडाचे झाड कितीही मोठे झाले तरी पारंब्या जमिनीवर असतात त्यामुळे आम्ही पारंब्या आहोत. शरद कोळी यांना आमच्या शुभेच्छा आहे असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

दसरा मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून पाच ते सात हजार शिंदे गटाचे कार्यकर्ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळचा ऐतिहासिक शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला दीड ते दोन लाख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव शहर व ग्रामीण दसरा मेळाव्याच्या बैठकी नंतर पत्रकारांशी ते बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, हिम्मत असेल तर माझ्याविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लढावे असे आव्हान त्यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार माझ्याविरुद्ध उभा करावा व तेव्हा झाड कोण आणि पारंबी कोण हे लक्षात येईल असे पाटील म्हणाले. सालाबादप्रमाणे दसरा मेळावा होत आहे,  जिल्ह्यातून दसरा मेळाव्याला जाण्या साठी पाच ते सात हजार कार्यकर्ते तयार आहेत. प्रत्येक तालुक्यातील बैठका झालेल्या असून कोण कोणत्या मार्गाने जाणार मुक्काम कुठे करणार कोणाशी संपर्क करणार याची नोंदणी सुरू झालेली आहे. या दसरा मेळाव्याला दीड ते दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

The post शरद कोळी इतके मोठे नाही की, मी त्यांच्या आरोपांवर उत्तर द्यावे : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.