नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे दिली. पण आश्चर्याची बाब म्हणजे, भुजबळ यांनी एक दिवसापूर्वीच रविवारी (ता.२१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्या ठिकाणी उपस्थित होते.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
साहित्य संमेलन आणि कोरोना आढावा बैठकीलाही उपस्थिती
'माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा,' असं छगन भुजबळ यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. तसेच भुजबळ यांनी रविवारी साहित्य संमेलन आणि कोरोना आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती. तसेच, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यालाही ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी होते. त्यामुळे चिंता वाढली आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक येथे पार पडला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks यांच्यासमवेत वधू वरांना शुभेच्छा दिल्या व भावी उज्वल वाटचालीस सदिच्छा दिल्या. pic.twitter.com/Fy8wOXgBkp
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 21, 2021
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय