
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे शुक्रवारी (दि. १०) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1 ला त्यांचे हॉटेल एमराल्ड पार्क येथे आगमन होणार असून, तिथे ते निवडक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी 3 ला मॅरेथॉन चौक येथील रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पवार कळवणच्या दिशेने रवाना होणार आहेत. आमदार नितीन पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
- विधानसभेत टॅब, तर परिषदेत नेहमीचे कागद
- पुणे : जलपर्णीच्या कामाबाबत आयुक्तही अनभिज्ञ; माहिती न दिल्याने अधीक्षक अभियंत्याला नोटीस
- बारावी पेपर फुटीप्रकरणी प्राचार्यासह पाच अटकेत! मुंबई पोलिसांची नगरमध्ये कारवाई
The post शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.