शरद पवार यांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट : कौतिकराव ठाले पाटील

नाशिक : 'शरद पवार यांना मोठं करण्यासाठी दिल्लीत संमेलनाचा घाट घातला होता,' असा आरोप अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 2020-21 या वर्षाच्या 'अक्षरयात्रा' या वार्षिक अंकातून अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकमध्ये नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याशिवाय संमेलनाच्या निधीवरुन ठाले पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. परंतु यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

कौतिकराव ठाले पाटील यांच्या या सडेतोड लेखामुळे साहित्य क्षेत्र आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीला संमेलन व्हावे अशी मागणी करणारी पुण्याची सरहद्द संस्था, नाशिकच्या संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळ यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नाशिकच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यावर ठाले पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

कौतिकराव ठाले पाटील यांच्या लेखातील काही महत्त्वाचे मुद्दे -

1. अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे काही लोक 'धंदा' म्हणून पाहू लागले आहेत असे माझे निरीक्षण आहे.

2. संमेलनाला सत्तेतील नेते आणून सरकारी दरबारी अडलेली वैध, अवैध कामे मार्गी लावली जातात किंवा सार्वजनिक हिताच्या नावाखाली नवी कामे पदरात पाडून घ्यायला साहित्य संमेलनाइतके दुसरे चांगले साधन असू शकत नाही.

3. घुमानला संमेलन घेतलेल्या पुण्यातील एका संस्थेला दिल्लीत संमेलन घेऊन शरद पवारांना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष करुन त्यांना 'मोठे' करायचे होते. शरद पवारांचे सहस्त्रचंद्रर्शन या आशयाच्या बातम्या लोकसत्त्तामध्ये छापून आणल्या.

4. नाशिकला संमेलन होणार असा निर्णय जाहीर होताच दिल्लीसाठी आग्रही असणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांनी मला फोन केले, धमक्या दिल्या.

5. नाशिकमधील संमेलन कमी खर्चात आटोपशीर पद्धतीने घ्या असे मी आधीच आयोजकांना सुचविले होते मात्र कोटींच्या घरात जाणारे अंदाजपत्रक बघून मी अस्वस्थ झालो. एवढी गरज काय?

6. निधी आणि चुकीच्या वाटणाऱ्या कामांबाबत मला भुजबळ यांच्याशी बोलायचे होते मात्र आयोजक लोकहितवादी मंडळाने तसे होऊ दिले नाही.

7. ज्या तारखांना हे संमेलन घेण्याचे ठरवले होते तोपर्यंत नाशिक शहराने कोरोना संकटाच्या उपद्रवाने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भविष्यात निधीवरुन संभवू शकणाऱ्या चर्चेलाही कारण मिळण्याची शक्यता मावळली आणि सूक्ष्म नजरेच्या जागरुक नाशिककरांच्या तोंडी आणि लेखी तक्रारींतून माझी तसंच साहित्य महामंडळाची सुटका झाली.

8. आमच्या सूचनांचे आयोजकांनी पालन केले नाही. भुजबळांनी नाशिक जिल्ह्यातील आमदारांशी बोलून आमदार निधीतून संमेलनासाठी मोठी रक्कम मिळवली. मात्र आमदार निधी साहित्य संमेलनासाठी वापरणे योग्य नाही, नाहीतर हे महाराष्ट्र सरकारचे संमेलन होईल.

9. कोणी 'एकतंत्री' कारभार करत असेल तर त्याला त्यापासून रोखले पाहिजे, ऐकत नसेल तर बाजूला केले पाहिजे. (नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील शिक्षण व इतर संस्था, कारखाने, बँका, उद्योजक, कंत्राटदार, हॉटेलमालक, व्यापारी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, नोकरवर्ग, लेखक, रसिक व सामान्य लोक यांनी आपापल्या ऐपतीनुसार स्वागताध्यक्ष श्री. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली 'निधी' जमा केला पाहिजे; निधी दिला पाहिजे. तो नेटकेपणाने, योग्य पद्धतीने कसा खर्च होईल ते पाहिले पाहिजे. कोणी 'एकतंत्री' कारभार करत असेल तर त्याला त्यापासून रोखले पाहिजे; ऐकत नसेल तर बाजूला केले पाहिजे; तरच नाशिकचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोषरहित करता येईल; ते नाशिककरांचे होईल. अर्थात कोरोनाच्या संकटाने तशी संधी आपणा सर्वांना दिली तरच! नसता हे संमेलन या जीवघेण्या संकटामुळे रद्द होण्याचीच शक्यता जास्त!)

10. मराठी संमेलन हा सर्वोच्च सोहळा आहे. पण या सोहळ्याला कोणी आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थासाठी वापरु पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे.