सिडको : पुढारी वृत्तसेवा– शहरात सर्वत्र सराइत गुन्हेगारांकडून तलवारी व चॉपर निघत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम सुरू करण्यात आली असून, यात एका विधिसंघर्षीत बालकाकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ९) पोलिस उपनिरिक्षक अजय पगारे यांना मिळालेल्या बातमीनुसार एक विधी संघर्षित बालक हा चुंचाळे येथील म्हाडा वसाहतीजवळ असलेल्या संत शिरोमणी क्रिडांगणजवळील एका दुकानाजवळ धारधार तलवार बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनाप्रमाणे सापळा रचून त्यास त्याब्यात घेतले.
हेही वाचा-
- बीड : माजलगाव येथील पोलिस ठाण्यासमोर मनोरुग्णाची दगडफेक
- HBD Jaya Bachchan : जया बच्चन झाल्या ७६ वर्षांच्या; अमिताभ म्हणाले…माझी अर्धांगिनी
The post शहरात तलवार बाळगणारा विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.