शहरात दुचाकी बॅटरीचा तुटवडा! ग्राहकांना १५ दिवसांची वेटिंग 

जुने नाशिक : लॉकडाऊनमुळे कमी उत्पन्न आणि अनलॉकनंतर वाढलेली मागणीने शहरात दुचाकीच्या नवीन बॅटरीचा खडखडाट जाणवत आहे. काही कंपन्यांच्या बॅटरी येत आहे. तर काही कंपनीच्या बॅटरी अजूनही बाजारात उपलब्ध नाही. छोट्या विक्रेत्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

काही महिन्यापासून शहरात दुचाकी वाहनांचे बॅटरी मिळणे कठीण झाले आहे. बॅटरी बदलण्यासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना विविध दुकानांचे उंबरठे झिझविण्याची वेळ आली आहे. लॉकडाउनमुळे अशी परिस्थिती झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. लॉकडाउन काळात अनेक महिने कंपनी बंद असल्याने उत्पन्न झाले नाही. दरम्यान कुणासही बाहेर फिरण्यास परवानगी नसल्याने वाहनेही एकाच ठिकाणी पडून होती. वापर झाला नसल्याने बॅटरी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनलॉक होताच बॅटरी बदलण्यासाठी वाहनधारकांनी दुकानांवर गर्दी केली. बॅटरीचा तुटवडा असल्याने त्यांना नवीन बॅटरी उपलब्ध होऊ शकल्या नाही. मागणीपेक्षा उपलब्ध होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. दुकानात आलेल्या बॅटऱ्या हातोहात विक्री होऊन पुन्हा तुटवडा जाणवत आहे. एका विशिष्ट कंपनीच्या बॅटऱ्या बाजारात शिल्लकच नसल्याचे नसून, त्यासाठी १५ दिवसांची वेटिंग असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नामांकित कंपनीच्या बॅटरीच्या बाबतीत असे होत नाही, तर असेंबल बॅटरीचाही तुटवडा जाणवत आहे. बॅटरी तयार करण्यासाठी लागणारे लिड मिळत नसल्याने बॅटरी असेंबल होत नाही. चारचाकी तसेच अन्य वाहनांच्या तुलनेत दुचाकी बॅटरी विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दैनंदिन ३०० ते ३५० दुचाकीची बॅटरी शहरातून विक्री होत असते. काही दिवसांपासून बॅटरी विक्रीची परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

जुन्या मॉडेलच्या बॅटरी तर नाहीच... 

सद्या दुकानात जितक्या प्रमाणात दुचाकीच्या बॅटरी उपलब्ध होत आहे. त्या केवळ नवीन मॉडेलच्या दुचाकीच्या बॅटरी आहे. जुन्या मॉडेलच्या बॅटरी तर मिळतच नाही. त्यामुळे अनेकांकडून नवीन बॅटरी बाजारात येत नाही. तोपर्यंत जुन्याच बॅटरीची दुरुस्ती करून घेतली जात आहे. त्यातही दुरुस्ती होण्याचे प्रमाण कमी आहे. बऱ्याच वाहनधारकांना विनाबॅटरी वाहनांचा वापर करावा लागत आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

दुचाकीसाठी लागणाऱ्या सर्वच बॅटरीचा काही महिन्यापासून तुटवडा जाणवत आहे. सध्या काही प्रमाणात बॅटरी विक्रीस येत आहे. हळूहळू बॅटरी उपलब्धतेची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. जुन्या मॉडेल वाहनांच्या बॅटरी मात्र उपलब्ध होत नाही. 
जीनल शहा, बॅटरी विक्रेते.