शहरात दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे; ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

जुने नाशिक : भद्रकाली पोलिसांनी दोन ठिकाणी जुगारअड्ड्यांवर छापे मारले. रोख रकमेसह मोबाईल, जुगाराचे साहित्य, असा ४६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

दहा जणांना अटक 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांना खडकाळी आणि नानावली परिसरात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्‍वर मोहिते, मन्सूर शेख, जी. एल साळुंके, संजय पोटिंदे, एल. एच. ठेपणे यांनी शुक्रवारी (ता. २२) रात्री नानावली भागातील बेकरीसमोरील पत्र्यांच्या शेडमधील जुगारअड्ड्यावर छापा मारला. दहा जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. शेरू अहमद शेख (वय ५०, रा. बागवानपुरा), मुज्जफर मोईन्नोद्दीन शेख (३८, रा. भोई गल्ली), श्‍याम मळय्या बस्ते (३९, रा. अमरधाम रोड), साजन संजय ठाकरे (२९, रा. भगवतीनगर, टाकळी रोड), योगेश मधुकर गरड (३६, रा. पुणा रोड), अजीम हुसेन शेख (५४, रा. मुलतानपुरा), कय्यूम महंमदसफिक अत्तार (५०, रा. जुने नाशिक), आरिफ युसूफ शेख (५०, रा. पंचवटी), जयत मधुकर शिरसाट (४०, रा. खैरे गल्ली), शाहनवाझ मैन्नोद्दीन शेख (३०, रा. खडकाळी) अशा दहा जणांना अटक केली. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

४६ हजारांचा मुद्देमाल जप्त 

त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, तसेच जुगाराचे साहित्य, असा ३८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचप्रमाणे हवालदार जाधव, कोळी, निकुंभ, फरीद इनामदार यांनी खडकाळी परिसरातील एका बोळीत छापा मारला. अब्दुल कादीर शेख (५५, रा. पठाणपुरा), खलिल इस्माईल अत्तार (४६, रा. काजीपुरा), योगेश हिंगे (४२, रा. दिंडोरी रोड), एजाज इस्माईल अत्तार (४५, रा. काजीपुरा), केदू काशीनाथ ठाकरे (५१, रा. कथडा), अशा पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईलसह रोख रक्कम, असा आठ हजार ६३० रुपयांचा ऐवज जप्त केला.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच