शहरात ४५५ हॉटेल, रेस्टारन्ट फायर ऑडीट विनाच; मालकांना महिनाभराचा अल्टीमेटम

नाशिक : मुंबईतील कमला मिल आग दुर्घटने पाठोपाठ भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट व बारला फायर ऑडीट करण्याच्या सुचना देण्यात आल्या. परंतू अग्निशमन दलाकडे प्राप्त आकडेवारीनुसार ५३८ हॉटेल्सपैकी फक्त ८३ मिळकतींचे फायर ऑडीट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून ४५५ हॉटेल्स मालकांना अंतिम अल्टीमेटम देण्यात आला आहे. 

भंडारा दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी

दोन वर्षांपुर्वी मुंबईतील कमला मिलला आग लागण्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ भंडारा येथील दुर्घटना घडल्याने भविष्यात नाशिक मध्ये अशी दुर्घटना घडू नये साठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने सर्वेक्षणाची मोहिम हाती घेतली. मोहिमेत हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संकुले आदींसाठी अग्निरोधक प्रतिबंधक साधने बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंत्रणा बसविल्यानंतर वर्षातून दोनदा त्रयस्थ संस्थेमार्फत यंत्रणांची तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठीचे बी- प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडून प्राप्त होते. परंतू शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, रेस्टारन्ट, बार मध्ये फायर ऑडीट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

अवघ्या ८३ हॉटेल्सला गांभिर्य 

आग दुर्घटनेचे गांभिर्य फक्त ८३ हॉटेल्सला असल्याचे आढळून आले आहेत. शहरात ५३८ हॉटेल्स, रेस्टांरट, बियरबार व लॉजेस असून त्यातील ४५५ हॉटेल्स व रेस्टारंटमध्ये फायर ऑडीट झालेले नाही. त्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत अग्निशमन विभागाने अल्टीमेटम दिला असून अन्यथा पन्नास हजार रुपये दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 

बहुतांश हॉटेल्सचे अतिक्रमण 

शहरातील बहुतांश हॉटेल्स टेरेस, तळमजल्यात थाटण्यात आले आहेत. त्यामुळे फायर ऑडीट केल्यास अतिक्रमणसमोर येण्याच्या धास्तीने हॉटेल्स चालक पुढे येत नसले तरी निमित्ताने ग्राहकांचा जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

अन्यथा होणार कारवाई

शहरात ५३१ रुग्णालये, नर्सिंग होम आहेत. त्यांनाही फायर ऑडीट बंधनकारक असताना नियमितपणे वर्षातून दोनदा ऑडीट होत नाही. आतापर्यंत फक्त १६० हॉस्पिटल, रुग्णालयांचे फायर ऑडीट झाल्याची बाब अग्निशमन विभागाच्या पाहणीत आढळून आली. आता भंडारा दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई केली जाणार असल्याची माहीती अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांनी दिली. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क