शहापूर भीषण अपघात : शिवशाही बस व इनोव्हा गाडी धडक; विशेष सरकारी वकीलांची गाडी अपघातग्रस्त

नाशिक : विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला अपघात झाला. गुरूवारी रात्री (ता.१८) उशिरा शहापूरजवळ शिवशाही बस आणि इनोव्हा गाडी व कंटेनर यामध्ये विचित्र अपघात झाला.

तिहेरी भीषण अपघात; विशेष सरकारी वकिलांच्या गाडीला अपघात

मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटला. ही बस विरुद्ध दिशेने मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवर जाऊन आदळली. त्यातच मागून मुंबईच्या दिशेने जाणारी सरकारी वकील मिसर यांची इनोव्हा गाडी व कंटेनर आणि पुलाच्या कठड्यात जाऊन अडकली. दरम्यान अपघातात बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तिहेरी भीषण अपघातात मिसर थोडक्याच बचावले.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा