शाब्बास पोरी! आरोग्यसेवेतील आईची लेक देशसेवेसाठी लष्करात; पंचक्रोशीत कौतुक

नांदगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील जातेगाव येथील आशा स्वयंसेविका परिघा पवार यांची कन्या वैशाली पवार यांची भारतीय लष्करातील आयटीबीपीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे वैशाली पवार व समर्थ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. गावातील शेतकरी महिला, पुरुष, विद्यार्थी व परिसरातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या आईची लेक लष्करात

आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या आईची लेक लष्करात दाखल होऊन देशसेवा करणार असल्याची घटना अभिमानस्पद असल्याबद्दल वक्त्यांनी वैशालीच्या यशाचे कौतुक केले. कैलास पवार यांनी प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार यांनी आभार मानले.  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

वैशाली पवारचा सत्कार

संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस देवीदास भोपळे, आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा दीपाली कदम, तालुकाध्यक्षा चित्रा तांबोळी, शारदा निकम, शीतल आहेर, इंदुमती गायकवाड, आशा संघटनेच्या तालुकाध्यक्षा लता लाठे आदी उपस्थित होते. संघटनेतर्फे वैशाली पवार यांचा सत्कार जिल्हा संघटक विजय दराडे यांनी केला.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट