शालिमारला महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

विनयभंग

नाशिक : शालिमार येथे रात्री नऊ वाजता दोघांनी मिळून महिलेचा विनयभंग करीत तिस शिवीगाळ केली. तसेच पीडितेच्या पतीस मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात संशटित बंटी शहा, आरबाज हुसेन पठाण (रा. खडकाळी) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी रविवारी (दि.१६) रात्री नऊ वाजता विनयभंग करीत तिच्या पतीस मारहाण केली. तसेच पीडितेच्या दुकानाची तोडफोड केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.