शाळा बंद पण कामे चालूच! महापालिकेकडून शासकीय आदेश धाब्यावर 

नाशिक : महापालिककेने शाळा बंद संदर्भात आदेश काढला आहे. मात्र त्याचवेळी बंद केलेल्या शाळेतील शिक्षकांसाठी मात्र कामे लावली आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येते आहे म्हणून एका बाजूला शाळा बंद 
केल्याचा आदेश काढायचा पण त्याचवेळी दुसरा आदेश काढून बंद ठेवलेल्या शाळेतील शिक्षकांना ड्युट्या लावून काम करुन घ्यायचे असा शासकीय आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

येत्या १५ मार्चपर्यंत शाळा बंद असा शासनाचाच आदेश आहे. कोविडची दुसरी लाट आली असताना आणि दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असताना नाशिक मनपाच्या शिक्षणाधिकारी शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वे करण्यास सांगितले गेले आहे. १ मार्चपासून १० मार्च दरम्यान शहरातील शाळा बाह्य मुलांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेसाठी शिक्षकांना ड्युट्या लावल्या आहेत.