शाळा सुरक्षारक्षकास अल्पवयीन मुलांकडून जबर मारहाण; शाळा परिसरातील धक्कादायक प्रकार 

सिडको (नाशिक) : महापालिकेचे माध्यमिक विद्यालय सध्या कोरोनामुळे  बंद असल्याने येथे त्यावेळीच ही घटना घडली...नेमका प्रकार काय?

नेमका प्रकार काय?

शाळा परिसरात मद्यप्राशन करू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने अल्पवयीन मद्यपी टवाळखोरांनी महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली. गणेश चौकामध्ये नाशिक महापालिकेचे माध्यमिक विद्यालय परिसरात काही मद्यपी व गर्दुल्ले नशा करण्यासाठी नेहमी येतात. हा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक येथील सुरक्षारक्षकाकडे नेहमी तक्रार करत असे. नागरिकांची तक्रारीची दाखल घेत सुरक्षारक्षक संतोष निकम यांनी बुधवारी संबंधितांना येथे मद्यपान करू नका, असे सांगितले.

सुरक्षारक्षकाचा एक डोळा बालबाल बचावला

याचा राग आल्याने संबंधितांनी सुरक्षारक्षकास दगड, काठ्यानी बेदम मारहाण केली. सुदैवाने सुरक्षारक्षकाचा एक डोळा बालबाल बचावला. वेळीच नागरिकांनी धावत सुरक्षारक्षकांचे प्राण वाचविले. यासंदर्भात अंबड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मद्यपी व टवाळखोरांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांत जोर धरू लागली आहे. 
 
हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

मनपा शाळेच्या परिसरात नेहमी टवाळखोर दादागिरी करताना दिसतात. आता तर सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याने त्यांनी हद्दच ओलांडली आहे. विद्यामंदिराच्या परिसरात असा घाणेरडा प्रकार होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. संबंधित तरुणांविरोधात कठोर कारवाई व्हावी. 
- मकरंद सोमवंशी, विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सिडको 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ