शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक भरती गोत्‍यात! संशयित रितेश ठाकूरच्या अडचणीत वाढ

नाशिक : आदिवासी विकास विभागातर्फे २०१९ मध्ये झालेली विशेष शिक्षक भरती गोत्‍यात येण्याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. फसवणूक झालेल्या तक्रारदार यांच्याकडून भरती प्रक्रियेबाबतच प्रश्‍नचिन्‍ह व्‍यक्‍त केले जात आहेत. दरम्‍यान, नोकरीचे अमिष दाखवत पैसे उकळल्‍याच्‍या प्रकरणातील संशयित रोजंदारी संघटनेचा अध्यक्ष रितेश ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होणार असून, त्याच्या विरोधातील सुरगाण्यातील फसवणुकीचा गुन्‍हा अभोणा पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

वर्षानुवर्ष शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या अनुभवी कर्मचारी यांच्या साडेचार वर्षाच्या लढ्यानंतर तत्कालीन शासनाने भरतीची परवानगी दिली होती. त्‍यानुसार आदिवासी विकास विभागामार्फेत आदिवासी उमेदवारांसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये विशेष शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. याच शिक्षक भरतीत रोजंदारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष रितेश ठाकूर याने आश्रमशाळेवर काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचारी यांच्याकडून नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवित लाखो रुपये उकळले. यात जादा पैशाच्या हेतूने अपात्र, कमी अनुभवी उमेदवारांचे अनुभव वाढवा दाखवित, तसचे काही उमेदवारांची गुणवत्ता नसतानाही देखील कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली अनेकवेळा भरती प्रक्रियेत सहभाग घेत यंत्रणेवर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव टाकत अंतिम गुणवत्ता यादीत फेरफार करत अपात्र उमेदवार व जादा पैसे दिलेल्या उमेदवार यांना नोकरीचा लाभ दिल्याचा आरोप होत आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

या संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेत नक्कीच घोळ झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी जो कोणी दोषी असतील त्यांच्या नक्कीच चौकशी होवून न्याय मिळावा 
- चंद्रकांत गावित 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी