शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी दि. 30 जूनपर्यंत देण्यात आलेल्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या नोंदणीसाठी गुरुवार दि. 7 मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठीची प्रवर्गनिहाय आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. 30 तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी यामध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तसेच नवीन नोंदणीचीही मुदत 7 जुलैपर्यंत आहे. त्याचप्रमाणे आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येत असून, त्यासाठी 11 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्वरित रोजगार मिळविण्यासाठी तंत्रनिकेतन हा अतिशय उत्तम पर्याय आहे. डिप्लोमानंतर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीच्या संधी तसेच खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सविस्तर माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास अथवा 8698781669 किंवा 8698742360 या मदतकक्षास संपर्क साधवा.

प्रवेशाची अंतिम दिनांक आदींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता जाहीर झाल्यानंतर घोषित केले जाणार आहेत. त्यासंबंधित poly22.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचलनालय संचालक यांनी कळवले आहे.

सुधारित वेळापत्रक असे…
2 ते 7 जुलै : ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत
9 जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
9 ते 11 जुलै : आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत
12 जुलै : अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी

हेही वाचा :

The post शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ appeared first on पुढारी.