Site icon

शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खडसे बोलत होते. ते म्हणाले की,“मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे आणि परत आमचं सरकार येऊ दे, असे साकडे घालणार”, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

…ही प्रेयसीच्या आठवणीसारखी

“४० बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे”, असा चिमटा देखील खडसेंनी पुन्हा एकदा काढला. एकनाथ खडसे यांनी नुकतेच मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती.

काव्यमय शैलीत टीका

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते. भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत ४० आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती.

हेही वाचलंत का?

The post शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार appeared first on पुढारी.

Exit mobile version