
नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मागील 21 वर्षांपासून 100 टक्के अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने शिक्षक सहभागी होत असून, ‘द्या अनुदान, 100 टक्के’च्या घोषणा देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात विनावेतन ज्ञानदानाचे काम करणार्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. 15 ते 20 वर्षांपासून अनेकांना वेतनाची प्रतीक्षा आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याप्रसंगी फक्त आश्वासनांवर बोळवण केली जाते. ठोस निर्णय होत नसल्याने संतप्त शिक्षकांनी आझाद मैदानावर 10 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. विनाअनुदानित शिक्षक व 20 ते 40 टक्के अनुदानित शाळा – महाविद्यालयांचे महाराष्ट्रभरातील हजारो शिक्षक त्यात सहभागी झाले आहेत. सर्व शिक्षकांना कायद्यानुसार 100 टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे. 15 नोव्हेंबर 2021 आणि 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार जुन्या प्रचलित धोरणानुसार अनुदान वितरणाचा शासननिर्णय निर्गमित होत नाही, तोपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले असून, यंदाची दिवाळी आझाद मैदानावरच साजरी करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा:
- Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीत रियल इस्टेट क्षेत्राला मिळणार बूस्ट
- सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी
- सांगवीत चाकू हल्ला करून ‘माॅर्निंग वाॅक’ला निघालेल्या महिलेला लुटले
The post शिक्षकांचे आंदोलन : ‘द्या अनुदान, शंभर टक्के’च्या घोषणांनी दुमदुमले आझाद मैदान appeared first on पुढारी.