नगरसुल: पुढारी वृत्तसेवा- येथील शिक्षक सतीश पैठणकर यांच्या बँक खात्यात तेलंगणातील व्यक्तीकडून चुकून जमा झालेले ८० हजार रुपये संबंधित व्यक्तीला परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल पैठणकर यांचा पोलिसांनी सत्कार केला.
तळवाडे येथील न्यु इंग्लिश शाळेतील शिक्षक सतीश पैठणकर यांच्या बँक खात्यात तेलंगणातील एका व्यक्तीने चुकून ८० हजार रुपयांची रक्कम जमा झाली. भल्या मोठ्या रकमेचा मेजेस येताच पैठणकर यांना आश्चर्य वाटले. काही क्षणात तेलंगणाहून पैसे पाठविणाऱ्या श्री. हनुमंत यांनी पैठणकर यांच्याशी संपर्क साधत माझ्याकडून चुकून आपल्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्याची विनंती केली. पैठणकर यांनी पोलीस निरीक्षक पुजारी यांची भेट घेऊन सर्व हकीगत सांगितली. श्री. पुजारी यांनीही तेथील पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेतले वास्तव समजून घेत श्री. हनुमंता यांचीच रक्कम असल्याची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर पैठणकर यांनी ही रक्कम हणमंता यांना ऑनलाईनच्या माध्यमातून परत केली. आपले पैसे अवघ्या काही मिनिटातच परत मिळाल्याने श्री. हनुमंत यांनीही आभार मानले. या प्रामाणिकपणाबद्दल पुजारी यांनी पैठकर यांना श्रीफळ देऊन सत्कार केला.
हेही वाचा :
- Dhule News | राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी अभिनव गोयल
- Nashik News : स्मशानभूमीत कणकेची बाहुली, लिंबू, टाचण्या, कवड्या; अंनिसने केली भिती दूर
- Bastar-The Naxal Story Teaser : जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येत आहे Adah Sharma
The post शिक्षकाचा प्रामाणिकपणा, खात्यात चुकून आलेले ८० हजार केले परत appeared first on पुढारी.