शिक्षक दरबारात गुरुजींचा गोंधळ! आमदार दराडे यांच्यासमोर समस्यांचा पाऊस 

नाशिक रोड : विद्यार्थ्यांना विद्यादान करणारे शिक्षकांनी गोंधळ घालत शिक्षक दरबारात अनेक समस्या मांडल्या. शिक्षक दरबारात गुरुजींनी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी मांडल्या. शिक्षक आमदार किशोर दराडे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, शिक्षक दरबारातून काय साध्य होणार, याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात चर्चिली जात आहे. 

येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूलमधील शोभेंदू सभागृहात शिक्षक दरबार झाला. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, एस. बी. देशमुख, साहेबराव कुटे यांच्यासह काही शिक्षक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक दरबार

शिक्षकांनी आपल्याला शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या वेगवेगळ्या वैयक्तिक व सार्वजनिक समस्या मांडल्या. शिक्षक मान्यता, कनिष्ठ वेतनश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, डीएड ते बीएडपर्यंत मान्यता, पगाराच्या अडचणी, शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अडचणी शिक्षकांनी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर मांडल्या. विविध प्रश्नांना शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी उत्तरे दिली. शिक्षक आमदार दराडे यांनी शिक्षकांच्या अडचणींना निराकरण करण्यासाठी हा शिक्षक दरबार आयोजित केला जात असून, पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षक दरबाराचे आयोजन केले जाते, असे सांगितले. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, सेक्रेटरी मिलिंद पांडे यांचा सत्कार करण्यात आला. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी भागीनाथ घोटेकर, प्राचार्य अलका चुंबळे, डॉ. अश्विनी दापोरकर, रोहित गांगुर्डे, दिनेश आहिरे, मोहन चकोर, एस. के. सावंत, माणिक मढवई, बाळासाहेब ढोबळे, संग्राम करंजकर उपस्थित होते. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट