शिक्षणाला वय नसतं! निवृत्तीनंतर ७९ वयातही ‘तो’ ध्यास; ज्येष्ठांना आदर्श

नाशिक : निवृत्ती झाली, वयही वाढले, आता काय होणार अशा विचारांनी अनेक निवृत्तीधारक नैराश्‍यात जातात. अशा परिस्थितीत ज्येष्ठांना आदर्श ठरावे, असे काम नोटप्रेसमधील निवृत्त कर्मचारी सुभाषचंद्र आहेर यांनी वयाच्या ७९ वर्षी केले.
 

निवृत्तीनंतरही तो ध्यास कौतुकास्पद!
सुभाषचंद्र आहेर यांचा जन्म १ जून १९४२ ला झाला. १९६५ नोटप्रेसमध्ये ॲप्रेंटिसशिप कर्मचारी म्हणून सेवेस सुरवात केली. ३१ मे २००२ ला कंट्रोल ऑफिस पदावरून निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर लगेचच विविध प्रकारच्या पदविका संपादन करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्याकडे पूर्वीपासून बी.एस्सी. ऑनर पदविका होतीच. निवृत्तीनतंर बी.ए.,एम.सी.जे. पदवी प्राप्त केली. त्यापाठोपाठ मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदविका घेतली. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर एम.ए. मास्टरकी पदवी अशा चार पदविका संपादन केल्यानंतर मंगळवारी ऊर्दू भाषेच्या पाचव्या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतला.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

नैराश्‍यात गुरफटून न राहता नेहमी सुदृढ राहण्याचा प्रयत्न

आरोग्याचे जतन, पदविका घेण्याचा छंद, बुद्धीस सतत चालना देण्यासाठी शिवाय नैराश्‍यात गुरफटून न राहता नेहमी सुदृढ राहण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचे आहेर यांनी सांगितले. इतक्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा इतरांना फायदा करून देण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडून एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यात त्यांचा नातू आकाश आहेर याचादेखील समावेश आहे. चार पदव्या घेतल्यानंतर अजूनही काही करण्यासारखे आहे का अशा विचारात असताना २६ फेब्रुवारीला ‘सकाळ’मध्ये ‘ऊर्दू पदविका कोर्स प्रवेश सुरू’ आशयाचे वृत्त प्रसारित झाले होते. ते वाचून त्यांनी केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांच्याशी संपर्क साधला. अभ्यासक्रमांची माहिती घेऊन त्यांनी मंगळवारी दुपारी प्रवेश घेतला. दरम्यान, त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून फ्रेंच, गुजराती, ऊर्दू भाषेचा प्राथमिक अभ्यास केला. त्यानी निवृत्तीनंतर विविध प्रकारच्या चार पदविका प्राप्त केल्यातर सध्या वयाच्या ७९ वर्षी मंगळवारी (ता. २) त्यांनी ऊर्दू भाषेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

निवृत्त झालेल्यांनी नेहमी कुठल्याना कुठल्या सेवेत राहावे. मग त्यात विविध प्रकारचे छंद असोत किंवा अन्य कुठल्या सेवेत काम करून वेळेचा सदुपयोग केल्यास कुणासही नैराश्‍य येणार नाही. शिवाय त्यांचे जीवन आनंदायी होण्यास मदत होईल. -सुभाषचंद्र आहेर