शिर्डीला जायचयं? साप्ताहिक सुपर फास्ट विशेष रेल्वेगाडी; देवदर्शन होईल सुकर 

नाशिक रोड : दादर (मुंबई) ते शिर्डीदरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट आरक्षित विशेष गाडी सुरू होणार आहे. या विशेष गाडीने मुंबईकरांना देवदर्शन सुकर होणार आहे. ही विशेष गाडी दादर येथून शुक्रवार (ता. ५)पासून दर आठवड्याला पावणेदहाला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पावणेचारला शिर्डी येथे पोचेल.

मुंबईकरांना शिर्डीसाठी नाशिक रोड मार्गे रेल्वे   

नाशिक रोडला ती मध्यरात्री १२ वाजून ४७ मिनिटांनी, तर मनमाडला पावणेदोनला पोचेल. कोपरगावला येताना व जाताना तिला थांबा आहे. तसेच मुंबईकडे जाण्यासाठी ही गाडी शिर्डीहून दर शनिवारी सकाळी सात वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी एक वाजून २५ मिनिटांनी दादर येथे पोचेल. मनमाडला ती सकाळी पावणेनऊला, तर नाशिक रोडला नऊ वाजून ४२ मिनिटांनी पोचेल.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

नाशिक रोडमार्गे शिर्डीसाठी रेल्वेगाडी 

एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, पाच द्वितीय श्रेणी आसन अशी तिची रचना आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येईल. www.enquiry.indianrail.gov.in ला प्रवाशांनी भेट द्यावी किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा