शिवजयंतीनिमित्त “दोन गट”! वर्चस्वाच्या लढाईतून सोशल मीडियावरील “वॉर”

नाशिक : एकेकाळी आमने-सामने ( समोरासमोर ) होणाऱ्या लढाईनंतर शाब्दिक चकमकीत रुपांतरण झाली आणि आता तर ती सोशल मीडियावर दिसू लागल्याने दिवसागणिक या वादाचे स्वरूपही बदलल्याचे यानिमित्ताने कार्यकर्त्यांना बघायला मिळत आहे. तर काहींच्या मते प्रत्यक्षात हे वाद ओढवून घेण्यापेक्षा सोशल मीडियावरचा वाद कधीही चांगला असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचे पर्यावसन प्रत्यक्षात झाली नाही म्हणजे मिळवले.

युजर्सची मात्र चांगलीच करमणूक

शिवजयंती निमित्त सिडको परिसरात "दोन गट" निर्माण झाल्याने या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांचे गेल्या काही दिवसांपासून वर्चस्वाच्या लढाईतून सोशल मीडियावरील "वॉर"  रंगल्याचे दिसून येत आहे. फेसबुकवर एकमेकांना शह-प्रतिशह देण्यासाठी व्हिडिओ व गाण्याची एडिटिंग करून कमेंट्स टाकण्यात येत आहे. तर त्यावर कार्यकर्ते आपा आपल्या शैलीने उत्तर प्रतिउत्तर करत आहेत. असाच काहीसा मनोरंजनात्मक प्रकार सध्या सोशल मीडियावर यानिमित्तानं बघायला मिळत आहे. त्यामुळे युजर्सची मात्र यानिमित्ताने चांगलीच करमणूक होताना दिसत आहे.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

असे असले तरी सोशल मीडियावर निर्माण झालेले हे "सोशल वार" प्रत्यक्षात पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी सोशल मीडियावर थांबले म्हणजे बरे होईल ! असे मत एकमेकांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट