शिवजयंती निमित्ताने खंडणीची मागणी; नाशिकमध्ये शिवसेना- भाजपमध्ये पेटला वाद,ऑडिओ क्लिप व्हायरल!

सिडको (नाशिक) : शिवसेनेच्या युवा पदाधिका-याने शिवजयंतीचे निमित्त करून महापालिका ठेकेदाराकडून खंडणीची मागणी केली होती. भाजपच्या नगरसेवकाने मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ऐकविला. संबधित युवा सेनेचा पदाधिकारी शिवजयंती उत्सवाचा पदाधिकारी होता. त्यामुळे शिवजयंतीच्या नावाखाली खंडणी मागत असल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. यामुळे शिवसेना व भाजप यांच्याच आता चांगलेच राजकारण पेटले आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद असल्याचे बोलले जाते

शिवजयंती निमित्ताने खंडणीची मागणी

शिवसेनेच्या युवा पदाधिका-याने शिवजयंतीचे निमित्त करून महापालिका ठेकेदाराकडून खंडणीची मागणी केली, त्याबाबत त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत नगरसेवक शहाणे यांनी मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ऐकविला.  संबधित युवा सेनेचा पदाधिकारी शिवजयंती उत्सवाचा पदाधिकारी होता. त्यामुळे शिवजयंतीच्या नावाखाली खंडणी मागत असल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. प्रभाग २९ मध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. ही कामे महापालिका ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीची खंडणी मागायची आणि न दिल्यास काम करू द्यायचे नाही, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. याबाबत आपण स्वतः पुढाकार घेऊन अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

सिडकोत प्रथमच दोन गट
शहाणे म्हणाले, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिडकोत प्रथमच दोन गट निर्माण झाले. त्यावरून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली. त्यानंतर कशीबशी शिवजयंती शांततेत पार पडली. उत्सव पार पडूनही या गटातील वाद मात्र काही करता संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही गटात आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत खंडणीच्या निमित्ताने नाव वाद उफाळल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या ऑडिओ क्लिपमध्ये मनपा ठेकेदाराच्या माणसाकडे जयंतीच्या नावावर पैशांची मागणी करणारा ‘तो’ पदाधिकारी नेमक्या कोणत्या गटाचा आहे, या विषयी सध्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सवातील एका गटाचे नेतृत्व पवन मटाले यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व पवन कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु  आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

‘तो’ पदाधिकारी नेमक्या कोणत्या गटाचा
यानिमित्ताने सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात पोस्टर वॅार दिसून आले. तसेच, दोघांचा देखावाही शिवप्रेमींसाठी एक मेजवानी ठरला. शहरातील सर्वच पक्षाच्या बड्या नेत्यांनी या ठिकाणी जोरदार हजेरी लावली. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी देखील दोन्ही शिवजयंती उत्सव समितीच्या व्यासपीठावर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शविली होती. एकमेकाच्या वर्चस्ववादातून आता नव्याने एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून या ऑडिओ क्लिप मधील ‘तो’ पदाधिकारी नेमका कोण आहे, याची शोध सध्या कार्यकर्ते व पदाधिकारी करीत आहे.