शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख

धुळे : पुढारी वृत्तसेवा

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हाच शिवसेना असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अखेर शुक्रवारी,दि.17 धुळे जिल्हा शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात तीन जिल्हा प्रमुखांसह दोन महानगर प्रमुखांवर पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील रखडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना धुळे जिल्हय़ाच्या पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आले. यात जिल्हा प्रमुखाची जबाबदारी डॉक्टर तुळशीराम गावित मनोज दादाराव मोरे तसेच सतीश दिगंबर महाले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यात डॉक्टर तुळशीराम गावित यांच्याकडे साखरे आणि धुळे ग्रामीणचे कार्यक्षेत्र देण्यात आले असून मनोज मोरे यांच्याकडे धुळे महानगर पूर्व व शिंदखेडा तालुका तसेच सतीश महाले यांच्याकडे धुळे महानगरपालिका पश्चिम आणि शिरपूर तालुक्यात पक्ष वाढीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय गुजराती आणि संजय वाल्हे यांच्यावर महानगर प्रमुखांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या भागांमध्ये पक्षाची ध्येयधोरणे आणखी बळकट करून पक्ष वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांची शिकवण याचा प्रचार आणि प्रसार कराल असा विश्वास तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. अशा आशयाचे पत्र शिवसेना मध्यवर्ती पक्ष कार्यालय श्री भवानी चौक टेंभी नाका येथे ठाणे पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे खनिकर्म व बंदरे मंत्री दादा भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, धुळे नंदुरबारचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, साक्री तालुका आमदार मंजुळा गावित यांच्या आशीर्वादाने या नियुक्त्या करण्यात आल्या.

हेही वाचा:

The post शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख appeared first on पुढारी.