शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील : संजय राऊत

Sanjay Raut www.pudhari.com

नाशिक; पुढारी ऑनलाईन: शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या धर्तीवर अनेक आजी-माजी नेते, नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. ही शिवसेनेत निर्माण झालेली दरी लवकरच भरून निघेल आणि शिवसेना पुन्हा नव्या ताकदीने उभी राहील असे भाष्य आज (दि.८) शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केले.

नाशिकचे सर्व नगरसेवक आमच्यासोबत आहेत. सध्या राजकारणात चालू असणारे कृत्रिम वादळ लवकरच शांत होईल, असे राऊत यावेळी म्हणाले. ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी मालेगाव, नांदगावमधील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

भाजपने आमच्याबद्दल बोलणं आता थांबवलं आहे. कारण त्यांना आता ४० नवे भोंगे मिळाले आहेत असे बोलून भारतीय जनता पक्षाला मुंबईचे तुकडे करायचे आहेत, त्यासाठी त्यांना आधी शिवसेनेला संपायचे आहे, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च नायायालय प्रलंबित असताना राज्यपालांनी सरकार स्थापनेचा निर्णय घेणे ही झुंडशाही असून हे सरकार बेकादेशीर आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचलंत का?

The post शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील : संजय राऊत appeared first on पुढारी.