नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, संजय दुसाने, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राजाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख श्याम साबळे, शशिकांत कोठुळे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, प्रताप मेहरोलिया, रोशन शिंदे, दीपक मौले, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण, शिवा ताकाटे, विक्रम कदम, प्रमोद जाधव, नाना काळे, संदीप डहांके, योगेश चव्हाणके, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णाताई मटाले, संगीता जाधव, मेघाताई नितीन साळवे, मंदाकिनी जाधव, वैशाली दाणी, उत्तम दोंदे, सचिन भोसले युवासेना विस्तारक योगेश बेलदार, अंबादास जाधव, सदानंद काळे, रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, संदेश लवटे, किरण फडोळ, शुभम पाटील, शोभा गटकळ, अस्मिता देशमाने, मंगला भास्कर, ज्योती फड, पूजा धुमाळ, भिवानंद काळे, सनी रोकडे, योगेश वाणी, शरदचंद्र नामपूरकर, नितीन देशमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण शहरातील प्रमुख चौक भगवे केले असून, संपूर्ण महिना ‘भगवा महिना’ म्हणून साजरा केला जाणार आहे. इयत्ता दहावी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार, सरकार आपल्या दारी अंतर्गत ‘योजनांची जत्रा’ यात सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून लाभार्थींना लाभ मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय तपासणी शिबिर, शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटनांचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे सोमवारी (दि.१९) शिवसेना वर्धापन दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने शिवसैनिक गोरेगाव, मुंबई येथील आयोजित कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनी सांगितले.
हेही वाचा:
- पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला
- मुंबई : लोकल रूळावरून घसरली; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
- पिंपरी : वातावरणाच्या बदलामुळे फुलांच्या उत्पादनाला फटका; फुले महागली
The post शिवसेना वर्धापन दिन : शिवसेना करणार राज्यात 'भगवा महिना' साजरा appeared first on पुढारी.