शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवास सामान्य नागरिकांसोबत राजकिय नेत्यांंना देखील गाठयाला सुरुवात केली आहे. येथे शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी मध्यरात्री कल्पना पांडे  यांची प्राणज्योत मालवली.  माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या वहिनी होत्या. दरम्यान त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या  राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

कल्पना पांडे या नाशिक प्रभाग क्रमांक 24 चे प्रतिनिधित्व करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिवसेनेच्या रणरागिनी अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

कल्पाना पांडे या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडूण आल्या होत्या. त्यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा तसेच पालिकेतील काही समित्यांवर देखील त्यांनी काम पाहीले. महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या पांडे यांची प्रभागातील विकास कामे आणि मतदारांशी राखलेला जनसंपर्क यावर भिस्त होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांचे महापालिकेतील काम अतिशय आक्रमक होते. शिवसेनेला शोभेशी अशी कामाची आक्रमक शैली असल्याने महापालिकेत त्या नेहमीच चर्चेत असत. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा