शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या संकेतानुसार आज शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यमान फक्त पुण्यतिथी व जयंती पुरते मर्यादित

विद्यमान महानगरप्रमुख महेश बडवे व सचिन मराठे यांची उचलबांगडी करण्यात आली. बडवे यांच्याकडे पंचवटी ,नाशिक, पश्‍चिम व सिडको या विभागांची जबाबदारी होती तर सचिन मराठे यांच्याकडे नाशिक रोड पूर्व विभाग व सातपूर विभागाची जबाबदारी होते. दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाल्यानंतर दोघांकडूनही अपेक्षित असे काम झाले नाही. अवघ्या दोन वर्षात दोनच आंदोलने झाली. पुण्यतिथी व जयंती पुरते मर्यादित असलेल्या दोघा महानगर प्रमुखांबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
 

महापालिका निवडणुकीची जबाबदारी राहणार

भारत बंद व शेतकरी आंदोलनात या केंद्र सरकार विरोधात आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला नव्हता त्यामुळे दोन्ही महानगरप्रमुख यांची गच्छंती अटळ होती दोन दिवसापूर्वी संपर्क नेते खासदार संजय राऊत नाशिक मध्ये आल्यानंतर संघटनेत कुठलेही फेरबदल होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले  होते पण महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल व्हावेत असा सूर पक्षात लावला जात होता. त्यामुळे मुंबईत जातात खासदार राऊत यांनी दोन्ही महानगरप्रमुख यांच्या जागेवर ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती आज जाहीर केली. बडगुजर यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची देखील जबाबदारी राहणार आहे हजारो त्यांनीदेखील आगामी महापौर हा शिवसेनेचाच असेल असे जाहीर केल्याने बडगुजर यांची जबाबदारी वाढली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ