“शिवसेनेत काही नाराजी नव्हती, संघाच्या इच्छेमुळे भाजप प्रवेश”

नाशिक : माजी आमदार बाळासाहेब सानप हे विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार असूनही त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन निवडणूक लढविली. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागल्या त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता पुन्हा ते पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

यावेळी सानप यांनी सांगितले की, माझी शिवसेनेते काही नाराजी नव्हती. मात्र मी भारतीय जनता पक्षात खुप काम केले आहे. त्यामुळ कार्यकर्ते व समर्थकांचा मी भाजपमध्ये परतावे असा खुप आग्रह होता. संघ परिवाराचीही तशीच इच्छा होती. यामुळे शिवसेना सोडून भाजपमध्ये परतणार आहे.

इच्छेला अनुसरुनच परत येतोय..

सानप म्हणाले की,  "मी शिवसेनेत कोणावरही नाराज नव्हतो. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर पक्षप्रमुखांची सदीच्छा भेट घेतली होती. त्यावेळी काही नेत्यांना याविषयी कल्पना दिली होती. मी भाजपमध्ये अनेक वर्षे काम केले होते. संघटनात्मक काम केले तसेच विविध निवडणूकांत पक्षाला सत्ता मिळावी यासाठी देखील मी प्रयत्न केले. विशेषतः संघ परिवाराच्या विविध संस्थांमध्ये मी सक्रीय राहिलो आहे. त्यांच्याशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे. पक्ष बदलला तरी तो संपर्क कायम होता. परिवारातील अनेकांनी मी भाजपमध्ये परतावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याला अनुसरुनच मी परतत आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मी भाजप प्रवेश करणार आहे."

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात होणार प्रवेश

पंचवटी - भाजपचे नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे सोमवारी (ता.२१) दुपारी बारा वाजता भाजपमध्ये पुनप्रवेश करत आहेत. सोमवारी मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रक्षप्रवेश होत असल्याची माहिती सानप यांनी सकाळशी बोलताना दिली. सानप यांच्या भाजपमधील पुनप्रवेशाने नाशिक पूर्वमधील पक्षाची ताकद वाढणार असलीतरीही वर्षादीडवर्षांपूर्वी झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आलेली कटुता ते विद्यमान पदाधिकारी कसे मिटवितात, त्यांचे मनोमिलन कसे होते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

कहीं खुशी कही गम वातावरण

पक्ष प्रवेशामुळे सानप समर्थकांमध्ये जसे आनंदाचे वातावरण आहे तसे विरोधकांमध्ये देखील नाराजी पसरली आहे. सानप यांच्याकडे आठ, दहा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असली तरी त्यांच्या पुर्नप्रवेशनंतर त्यांची ताकद वाढू नये म्हणून विरोधक देखील सरसावले आहेत. विद्यमान आमदारांसह काही नगरसेवकांनी विरोध सुरु केल्याने भाजपला आगामी महापालिका निवडणुक सोपी नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. </p>

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..