शुभेच्छांच्या गर्दीतही शरद पवार यांच्याकडून बाजार समितीची चौकशी 

म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे संचालक मंडळाने शनिवारी (ता.१२) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यासह संचालक मंडळाशी पवार यांनी एवढ्या गर्दीतही संवाद साधून बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली. 

मुंबईत  पवार यांच्या शुभेच्छांसाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी होती. प्रत्येकजण पवार यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेण्यासाठी प्रतीक्षा करीत होता. मात्र अशाही भाउ गर्दीत नाशिकहून गेलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यासह संचालक तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे आदीशी चर्चा करीत, बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली. 

पिंगळे यांनी बाजार समिती सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारून अवघ्या तीन महिन्यांत केलेल्या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांची माहिती दिली. तर, श्री पवार यांनी संचालक मंडळाला शेतकरी हिताचे निर्णय घेत, बाजार समितीचा विकासाच्या सूचना देत शुभेच्छा स्विकारल्या. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण