शुर्पनखेचे नाक कापले ही तीच जागा! मंदिरातील आश्चर्यकारक गोष्टींचा भाविकांना अनुभव 

नाशिक : रामायण कथेनुसार भगवान राम आणि रावण यांच्यातील युद्धाचे मुख्य कारण म्हणजे शूर्पणखाचे नाक कापणे. यानंतरच रावणाने सीतेचे अपहरण केले होते आणि राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले होते ... म्हणून आपण रामायण कथेशी संबंधित एका अशा ठिकाणाची आपल्याला माहिती देणार आहोत, जिथे शूर्पणखेचे नाक कापले गेले होते. आणि त्या ठिकाणी एक मंदिरही उभारण्यात आले आहे. जिथे अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा आपल्याला अनुभवण्यास मिळतात

May be an image of one or more people

लक्ष्मणाची तपश्चर्या भंग करण्यासाठी शूर्पणखेचा प्रयत्न
असं म्हणतात कि, रामायणात दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या तपोवनात गोदावरी-कपिला संगमावर लक्ष्मणाने शेष अवतारात १२ वर्षे तपश्चर्या केली होती. रावणपुत्र मेघनाथला मारण्यासाठी ही तपश्चर्या केली होती. ही तपश्चर्या भंग करण्यासाठी रावणाची बहीण शूर्पणखा हिने प्रयत्न केला. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापून ते नदीच्या पलीकडे फेकले म्हणून शहराचे नाव 'नाशिक' पडले, अशीही आख्यायिका आहे. याच मंदिराच्या आवारात अनेक वर्षांपासून लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापतानाचा देखावा देखील आहे.

May be art of 2 people and people standing

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळेच 'नाशिक' 

लक्ष्मण मंदिराच्या गेल्यास ध्यानस्थानाने लक्ष्मणची मूर्ती पाहायला मिळते. तिथेच लक्ष्मणाने शुर्पनखेचे नाक कापले. तपोवन म्हणजे ‘’तपस्वी लोकांचे वन’’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता. रामायण या महाकाव्याशी हया निसर्गरम्य ठिकाणाचा संबध असुन वनवासा दरम्यान प्रभु राम,लक्ष्मण,सिता या ठिकाणची फळे ग्रहण करण्यासाठी येत होते. या ठिकाणीच रावणाची बहिण शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळे ‘’नाशिक’’ हे नाव पडले असे देखील म्हटले जाते. या पवित्र परिसरात रामपर्णकुटी, लक्ष्मीनारायण मंदिर, जनार्दनस्वामी मंदीर अशी मंदिरे आहेत. सिंहस्थ कुंभमेळया दरम्यान हया ठिकाणी साधुंचे वास्तव्य असते..

May be an image of text

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

कपिला आणि गोदावरी नदीचा संगम
आता आपण रामायण कथेशी संबंधित असलेल्या ठिकाणांची झलक पाहूया, असे सांगितले जाते की वनवासाच्या वेळी भगवान रामाने सीता आणि लक्ष्मण यांच्यासमवेत येथे झोपडी बांधली होती. त्याला मुनि भारद्वाज यांनी पंचवटीत रहाण्यास सांगितले. हा दंडकारण्य जंगलाचा भाग असायचा. पंचवटीच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या गोदावरी नदीकाठाचे स्थान तपोवन असे म्हणतात. येथे संख्याशास्त्राचे प्रणेते कपिल-मुनी यांनी बरीच वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्यानंतरही अनेक ऋषीमुनींनी येथे अनेक तपस्या केल्या. ही जागा घनदाट झाडाने भरलेली होती. म्हणूनच या भूमीला तपोवन म्हणतात. येथे कपिला आणि गोदावरी नदीचा संगम आहे. नदीच्या खडकाळ पात्रात बरीच मोठी छिद्र आहेत. त्याला ब्रह्मा-योनी, विष्णू-योनी, रुद्र-योनी, मुक्ति-तीर्थ, अग्नि-तीर्थ, सीता-तीर्थ / सौभाग्य-तीर्थ, कपिला-तीर्थ, सर्व-तीर्थ असे म्हणतात. 

May be an image of outdoors and text

लक्ष्मणजी हे शेषनागचे रूप
श्री राम यांच्या आदेशानुसार लक्ष्मण यांनी ईसी ठिकाणी शूर्पणखाचे नाक आणि कान कापले. रावणपुत्र मेघनाथ (इंद्रजित) याचा वध करण्यासाठी लक्ष्मणाने ही तपश्चर्या केली. अशी मान्यता आहे की, लक्ष्मणजी हे शेषनागचे रूप होते, येथे आणखी एक पर्णकुटी आणि लक्ष्मीनारायण भगवानांचे देखील मंदिर आहे.