शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता शेतकरी उतरले रेल्वे ट्रॅकवर

नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आज (ता.१८) नाशिक जिल्हा शेतकरी कृती समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी चक्क रेल्वेट्रॅक वर उतरून आंदोलन करताना दिसले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीचं धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना वेळीच ताब्यात घेऊन रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यात आला, याप्रसंगी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांनी हाक दिल्यामुळे, शेतकरी विरोधातील काळे कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज बिल कायदा 2020 रद्द करा, या मागणी साठी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कृती समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले.  (व्हिडिओ - अंबादास शिंदे)