तळवाडे दिगर (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यात मागील सलग पाच दिवसांपासून झालेली तुफान गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान गारपीटीने त्रस्त असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे महावितरन कंपनीने वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांचा भावनांचा उद्रेक झाला.
बागलाण तालुक्यातील केरसाने परिसरावर कोपलेल्या निसर्गामुळे उन्हाळ कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल (ता. २३) पुन्हा करसाने परिसरात तुफान गारपीट झाली आहे दरन्यान बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असतांना हा प्रकार घडला. त्यांना केरसाणे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
हेही वाचा - स्वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी
अन् लगेच चक्रे फिरली...
एकीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी जोडलेले वीज कनेक्शन दोन दिवसांपासून खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन जोडले जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला. महावितरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी निषेध केला. दरम्यान, बंद असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातूनच तातडीने चक्रे फिरवीत तात्काळ विजजोडणी करा असे आदेश दिल्यानंतर महावितरणने विजजोडणी सुरू केल्यानंतर ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले.
हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ