Site icon

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा

येवला, पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील खिर्डीसाठे येथील शेतकरी नागरे हे येवला तहसील कार्यालयातील कर्मचारी वाय. एस. मिटकरी (महसूल सहाय्यक) यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना यादी न देता उडवाउडवीचे उत्तर दिले. यानंतर नागरे यांनी येवला तहसील कार्यालयाचे तहसीलदार आबासाहेब महाजन यांना फोनवरून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली व माननीय तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करून विचारना केल्याचा मिटकरी यांना राग आला व यांनी थेट शेतकऱ्याला धक्काबुक्की करून कार्यालयातून घालवून दिले.

यानंतर नागरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांना फोनवरून दिली. संभाजीराजे पवार यांनी तात्काळ दखल घेत येवला तहसील कार्यालय गाठले व संबंधित अधिकारी जेवणासाठी घरी गेल्याचे कारण सांगत कार्यालयात येण्याचे टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजीराजे पवार यांनी नायब तहसीलदार पंकजा मगर यांची भेट घेत संबंधित संपूर्ण प्रकरण त्यांना सांगितल्यानंतर मिटकरी हे कार्यालयात आले आणि त्यांनी संबंधित शेतकऱ्याला हवी असलेली यादी दिली व शेतकऱ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

यावेळी शिवसेना नेते संभाजी पवार कांतीलाल साळवे बापूसाहेब गायकवाड यांच्या समवेत सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संभाजी पवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची वारंवार तक्रारी येत होत्या. तहसील कार्यालयामध्ये काम करताना अडवणूक केली जाते आहे. परंतु, शेतकऱ्याला थेट धक्काबुक्की करणे एक प्रकारे हुकूमशाही राजवटी प्रमाणे आहे. असला कुठलाही प्रकार येवला तहसील कार्यालय असो वा अन्य कुठलेही कार्यालय असो यापुढे खपवून घेतला जाणार नाही.

हेही वाचलंत का?

The post शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी शिकवला धडा appeared first on पुढारी.

Exit mobile version