‘शेतकऱ्यांचे हाल आणि व्यापारी मालामाल’! भाजीपाला पिकांची घसरण चिंताजनक

घोटी (नाशिक) : भाजीपाला शेतीमालाची नासधूस आणि शेतीमाल विक्रीचे योग्य नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र, यातून व्यापारी गब्बर होताना दिसत आहे. ‘शेतकऱ्यांचे हाल आणि व्यापारी मालामाल’ ही वस्तुस्थिती थांबविणे गरजेचे झाले आहे. भाजीपाला हंगाम सुरु होऊन दोन महिने कालावधी लोटला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाला पिकांचे दराची दिवसागणिक होणारी घसरण चिंताजनक होत असल्याचे समोर आले आहे. 

भाजीपाला पिकांची घसरण चिंताजनक
घोटी बाजार समिती आवारात दुपारच्या सत्रात दोनशेहून अधिक वाहनांतून सर्वप्रकारच्या पंधरा ते सोळा हजार प्लॅस्टिकच्या विविध पिकांच्या जाळ्या येत असतात. नियोजन नसल्याने बाजार दरात घसरण होत आहे. त्यातून हमाली, वाहन भाडे, त्यात माल वेळेत खरेदी होत नसल्याने मालाची तेजी कमी होत जाते. चांगल्या दर्जाचा माल कमी दरातून व्यापारी खरेदीसाठी संगनमताने शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. यामुळे जाळी मागे १०० रुपये नुकसान होऊन दिवसाला दीड लाखांपर्यंतच्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येते. त्यातून शेतकऱ्यांचे महिन्याला साडेचार कोटींचे निव्वळ नुकसान होत आहे. याला जबाबदार घटकांमध्ये बाजार समिती पालक म्हणून प्रशासक यांसह लोकप्रतिनिधी नाहीत का, दरवर्षीप्रमाणे यामध्ये होणारे नुकसान यावर गांभीर्याने चर्चा का करावीशी वाटत नाही. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

भाताचे दरही घसरलेलेच 
भाताच्या बाबतीतदेखील हंगामातच दर घसरले जातात. हे शेतकऱ्यांना न उलगडणारे कोडे आहे. बाजार समिती आवारात बाह्यशक्तीचे होणारे हस्तक्षेप व वाढते अतिक्रमणामुळे जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर अवकाळी, सुलतानी नंतर ढिसाळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सहकार तत्त्वावर पांढरा हत्ती किती दिवस पोसायचा, पुढे कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाउनसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा माल विक्रीचे संकट उभे राहू शकते. यासाठी वेळेत बाजार समिती पालकांनी यावर नियोजनबद्ध कार्यक्रम आखून पुढील संकटाचा सामना करायला हवा. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ