शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सदैव तत्पर : IGP दिघावकर 

झोडगे (जि.नाशिक) : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांची दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहू, असे मत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी मांडले.

पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी,

झोडगे ग्रामपालिका सभागृहात झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या वेळी झोडगे आउटपोस्ट येथील पोलिस कार्यालयाची इमारत व निवासस्थाने जीर्ण झाली असून, तत्काळ अद्ययावत इमारत उभारण्यात यावी, परिसरातील गावांची संख्या व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पाहता पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी या वेळी सभापती सुवर्णा देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. या वेळी झोडगेसह माळमाथा परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, विजय देसाई, नथू देसले, शांताराम लाठर, दीपक पवार, बापू विसपुते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रताप दिघावकर यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले