शेतकऱ्यांना फसवाल, तर तुरुंगात जाल ! कृषी विभाग दक्ष

कृषी विभाग www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा – खरीप हंगामाच्या तोंडावर वरुणराजाने कृपादृष्टी करीत बळीराजाच्या मनाजोगे आगमन केले आहे. पेरणीला सुरुवातही झाली आहे. कृषी विभागाने खते, बियाणे मुबलक उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे.

रासायनिक खते, कीटकनाशके बियाणे यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास संबंधित कृषिनिविष्ठा विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात विक्री केंद्रातून जादा दराने विक्री होऊ नये, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी सहायकांना लक्ष ठेवण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरून भरारी पथके तयार करण्यात आली असून, तालुकास्तरावर कृषी विभाग व पंचायत समिती गुणवत्ता निरीक्षक नियंत्रण ठेवणार आहेत. यासंबंधी कुठलीही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन येवला तालुका कृषी विभागाने केले आहे. बियाणे सोबत आलेल्या बुरशीनाशकची बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी करावी व जमिनीत ओलावा आल्यावर पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंडल कृषी अधिकारी, अंदरसूल हितेंद्र पगार यांनी केले आहे.

हेही वाचा: