विंचूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने याचा फायदा व्यापारी घेऊन त्याचा तोटा शेतकऱ्यांना होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
शेतकर्यांना दुष्काळात तेरावा महिना
गेल्या वर्षी द्राक्ष व कांदा पिके काढणीला आलेली असतानाच कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे द्राक्षांचे नाइलाजास्तव शेतकर्यांना घरीच मनुके तयार करून कमी भावाने विकावे लागले. तसेच कांद्याची निर्यात खुली झाली अन् दुसर्या दिवशी लॉकडाउन झाल्याने कांदाही खूपच कमी दराने विकला गेला. याचा परिणाम शेतकऱ्यांना बसला. यातून शेतकरी अजूनही सावरलेला नसताना याही वर्षी पिक काढणीचा हंगाम सुरू होत असताना मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होते की काय असा धसका शेतकर्यांनी घेतला आहे. आधीच नैसर्गिक अपत्तीने पाच सहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी व अवकाळी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यात भर म्हणून याही वर्षी कोरोनाचे वाढते प्रमाण बघता शेतकर्यांना दुष्काळात तेरावा महिना आला आहे. त्यातून आता कसे पडावे अशी चिंता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले
कोरोनामुळे गेल्या वर्षी शेतकर्यांचे नुकसान होऊन हाल झाले. त्यातून अजून शेतकरी सावरलेले नसताना तीच पुनरावृत्ती या वर्षी होते की काय अशी परिस्थिती आहे. शेतकर्यांना आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहेत. लॉकडाउन झाला तर शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.
- संदीप गारे, शेतकरी, खानगाव बु.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ